loader image

What is SSL ?

SSL बद्दल थोडीशी माहिती

SSL ची सरळ व्याख्या आहे SSL = Secure Socket Layer

आपला इंटरनेट ब्राऊजर आणि वेबसाइट यांच्या दरम्यान सुरक्षित व्यवहार व्हावा याकरिता तयार केलेली एक प्रणाली.

याचा मुख्य उद्देश आपल्या डिव्हाइसमधील  माहिती (डेटा) आपण ऑनलाईन व्यवहार करताना सुरक्षित रहावा.

आपण पहात असलेली वेबसाईट हि जर SSL वापरत असेल तर आपला इंटरनेट ब्राऊजर ती वेबसाईट सुरक्षित असल्याचे आपल्याला सांगते. अन्यथा ती वेबसाईट असुरक्षित असून त्या वेबसाईटला आपण भेट देऊ नये असे सुचवते.

SSL हे एक सुरक्षितता बाबत देण्यात येणारे प्रमाणपत्र आहे. ज्यामुळे आपल्या कडील माहिती कोणीही चोरणार नाही याची हमी दिली जाते.

आपल्या घराची सुरक्षितता व्हावी याकरिता घराला टाळे लावून आपण निर्धास्तपणे बाहेर जातो यासारखे आहे.

आपल्या घरातील सामान (माहिती) टाळे लावून गेल्याने कोणीही सहजासहजी चोरणारा नाही हि खात्री आपल्याला वाटते तशीच काहीशी सुरक्षितता या SSL मुळे आपण अनुभवू शकतो.

फरक एवढाच कि आपण घराला टाळे लावून घराबाहेर जातो. आणि येथे SSL चे हिरव्या रंगाचे टाळे पाहून ती वेबसाईट पहाण्यास / वापरण्यास / व्यवहार करण्यास सुरक्षित आहे. याची खात्री झाल्याने, पुढील ऑनलाईन कार्य करू शकतो.

येथे आपली माहिती त्या वेबसाइटला देणे (आदान – प्रदान करणे ). जसे
नाव, ईमेल आयडी, संपर्क जसे मोबाईल number, ऑनलाईन खरेदी इत्यादी. करणे सुरक्षित मानले जाते. 

(TLS= Transport Layer security)

error: Content is protected !!